शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेवर १५ दिवसांत पाच धमकीची पत्रे !

By admin | Updated: November 19, 2015 08:26 IST

पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी पत्रे रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली आहेत.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी पत्रे रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली आहेत. त्याची गंभीर दखल घेत, त्याचा तपास करतानाच सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गुजरातमधील तीन स्थानकांवर सुरुवातीला ही पत्रे आली. नवसारी स्थानकाच्या स्टेशन अधीक्षकांना ३0 आॅक्टोबर मिळालेल्या पत्रात राजधानी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस आणि आॅगस्ट क्रांती एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. याची गंभीर दखल घेत, सर्व गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी बार्डोली स्टेशन अधीक्षकांना रेल्वे स्थानक व बस स्थानक उडविण्याचे धमकी पत्र मिळाले. हे पत्र मिळाल्यानंतर १0 नोव्हेंबरला राजकोट येथील रेल्वे सुरक्षा दलाला कविगुरु एक्सप्रेस उडविण्याची, तर मंगळवारी नवसारी स्थानकात ओखा-वांद्रे टर्मिनस, बिकानेर-वांद्रे टर्मिनस आणि पश्चिम एक्सप्रेस या गाड्या उडविण्याची धमकी देणारे पत्र आले. या पत्राखाली आतंकवाद जिहाद सिमी अशी सही आहे. बुधवारीही वांद्रे स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात कटरा-हापा, अहमदाबाद-दरभंगा आणि फिराजपूर जनता एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे धमकी देणारी पत्रे आली आहेत. ही पत्रे प्राप्त झाल्यानंतर स्थानकांवरील सुरक्षा वाढविण्यात आली असून गाड्यांची आणि स्थानकांची तपासणी करण्यात येत आहे. - शरत चंद्रायन (पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)