शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:13 IST

कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे.

समीर देशपांडे कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणा-या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. विशेष म्हणजे २०१७मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही. अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू करण्यात आली आहे. तिची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होणार आहे.अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.>तीन टप्प्यांत मिळणार पैसेगरोदर मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळणार एक हजार रुपये.आधार कार्ड, बॅँकेच्या खात्याची माहिती दिल्यानंतर १८० दिवसांनंतर मिळणार दोन हजार रुपये.प्रसूतीनंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री झाल्यानंतर मिळणार दोन हजार रुपये.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाkolhapurकोल्हापूर