शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खारपाण पट्ट्यासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्‍प

By admin | Updated: May 6, 2017 13:56 IST

खारपाण पट्टा क्षेत्रातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्यशासन पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * गाडेगावच्या शेततळ्यांची पाहणीजळगाव जामोद : खारपाण पट्टा क्षेत्रातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्य शासन पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्‍ह्यातील गाडेगाव बु. ता. जळगाव जामोद येथील शेततळ्यांची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्री यांनी कलंत्री यांच्या शेतावर उपस्थितशेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खारपाण पट्ट्यातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपिकता वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाण पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवूनआणण्यासाठी पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच माध्यमातून जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना नीट शेती करता यावी, यासाठी प्रयत्न केले जातील.शेतीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांमुळे शेतीची सुधारणा आणि गुंतवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासन सामुदायिक शेतीचा प्रकल्प अंमलात आणत आहे. यासाठी किमान 20 शेतकरी आणि 100 एकर शेती असणे आवश्यक आहे. याएकत्रित झालेल्या सर्व शेतीमध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना एकत्रितरित्या राबविण्यात येतील. ठिंबक सिंचन, शेडनेट, फळबागा अशा विविध योजनांच्या माध्यमातून 50 लाख रूपयांची गुंतवणूक या सामुदायिक शेतीमध्ये होणार आहे. शेतीतील गुंतवणुकीमुळे भविष्यात शेतीचे उत्पन्न चार पट वाढविणे शक्य आहे. हा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यास पहिल्याच वर्षीशेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळेल. त्यामुळे जळगाव जमोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गाडेगाव बु. येथील सनुप कलंत्री, आशाबाई कलंत्री, जयनारायण कलंत्री, अनुपकुमार कलंत्री, संतोषकुमार गांधी यांच्या शेतमध्ये जाऊन कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित नागरीकांनी जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे 45 गावे खारपाण पट्ट्यात येत आहे. या खारपाण पट्टयातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी नागरीकांनी विनंती. याबाबत मुख्यमंत्री यांनी खारपाण पट्ट्यातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी शेततळे हा चांगला पर्याय आहे. या पट्ट्यातील नागरीकांनी शेततळ्यांसाठी एकत्रितरित्या समोर येण्याचे आवाहनकेले.यावेळी कृषी सहसंचालक सु. रा.सरदार यांनी शेततळे आणि परिसरातील शेतीची माहिती दिली.