नारायणगाव : तमाशा कलावंत छायाताई खिलारेसह चिरंजीव दीपक खिलारे यांच्या तमाशाच्या गाडीला अपघात होऊन त्यामध्ये ४ ते ५ कलावंत अत्यवस्थ आहेत, तर १६ कलावंत जबर जखमी झाले आहेत. या तमाशा कलावंतांकरिता शासनाने आर्थिक मदत करावी, तसेच राज्यातील सर्व तमाशा कलावंतांकरिता शासनाने ग्रुप विमा उतरविल्यास अपघात झालेल्या कलांवतांना आर्थिक मदत होईल. त्यामुळे ग्रुप विमा करावा, अशी मागणी अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी केली आहे.वरसूबार्इंच्या यात्रेनिमित्त छायाताई खिलारेसह चिरंजीव दीपक खिलारे यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परतीच्या प्रवासात तमाशाच्या गाडीचा अपघात झाला. कलावंतांसाठी जन-धन-योजना व आम आदमी योजना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट, संचालक दत्ता जाधव, प्रल्हाद आल्हाट, सुभाष दुबळे, आत्माराम कसबे, दशरथ साळवे, कलाकारांसाठी राबविणार आहेत.
पाच तमाशा कलावंत अपघातामुळे अत्यवस्थ
By admin | Updated: February 16, 2015 04:28 IST