शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

एकाच दिवसात शहरात पाच आत्महत्या

By admin | Updated: September 23, 2014 05:11 IST

शहरात कालपासून पाच जणांच्या आत्महत्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे

मुुंबई : शहरात कालपासून पाच जणांच्या आत्महत्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या दोघींनी बहुमजली इमारतींवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलीस सांगतात. तर केईएम रूग्णालयात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आहे.अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहाणाऱ्या एकता बाबर (३५) या महिलेने रात्री बाराच्या सुमारास ग्रीन एकर्स इमारतीच्या १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एकता यांच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्या बॉलीवूडमध्ये कलाकार पुरविण्याचे काम करत होत्या. सहा महिन्यांपुर्वी त्यांच्या वडलांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्या निराश आणि तणावग्रस्त बनल्या होत्या. ओशिवरा पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रूग्णालयात धाडला आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वॉर्डन रोडवरील ओशियानिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून बीना बजराणी (४४) यांनी आत्महत्या केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून बीना यांची मानसोपचारतज्ज्ञांकरवी उपचार सुरू होते. त्या एकाकी राहात असत, अशी माहिती वडील गुलाबराय यांनी गावदेवी पोलिसांना दिली. बीना यांनी ज्या घरातून उडी घेतली ते त्यांच्या आत्तेभावाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या येथे वास्तव्यास होत्या, अशी माहिती पोलीस देतात.वांद्रयाच्या शासकीय वसाहतीत राहाणाऱ्या कुणाल रामजी आंबवणेकर (२६) या तरूणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. चौकशीत आई-वडील नसलेला कुणाल शासकीय वासहतीत राहाणाऱ्या मावशीकडे वास्तव्यास होता. तो क्लिनर म्हणून काम करत होता. मावशी दोन दिवस घराबाहेर होती. ती परतली तेव्हा कुणालचा मृतदेह आढळला. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून कुणालच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.दारूच्या व्यसनावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नरसिंहा नरयप्पन नेत्रे (२६) या तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. काल रात्री आठच्या सुमारास विक्रोळीच्या टागोर नगरात ही घटना घडली. (प्रतिनिधी)