शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नाशिक धान्य घोटाळ्यात ५ रेशनमाफियांवर मोका

By admin | Updated: June 2, 2015 02:00 IST

नाशिकमधील रेशनिंग धान्य अपहार प्रकरणात ५ रेशनमाफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील

पुणे : नाशिकमधील रेशनिंग धान्य अपहार प्रकरणात ५ रेशनमाफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अन्नधान्य वितरण विभागात राज्यात प्रथमच मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.नागरी पुरवठा आयुक्त कार्यालयाच्या सहायक संचालकांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील धान्य गोदामांची तपासणी केली असता तब्बल ३० हजार क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अशाच प्रकारे सिन्नर येथेदेखील रेशनिंगच्या तांदळाच्या २८० गोण्या परस्पर खासगी राइस मिलमध्ये पाठवून घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित प्रकरणात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ७ तहसीलदारांसह सुमारे १७ जणांना निलंबित केले. त्यानंतर या प्रकरणाची जिल्हा पोलीस उप-अधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात आली. त्यात रेशनमाफियांची संघटित टोळी असल्याचे निदर्शनास आले, असे बापट यांनी सांगितले.रेशनमाफिया टोळीचा म्होरक्या संपत घोरपडे (५०), विश्वास घोरपडे (४६), अरुण घोरपडे (४४), मगन उर्फ मदन पवार (४३) आणि रमेश पाटणकर (४५) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. हे सर्व जण वाहतूकदार आणि ठेकेदार आहेत.