शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

विदर्भातील सिंचन घोटाळ्यात पाच अधिका-यांवर दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:41 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील कालव्याच्या बांधकाम निविदेतील गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात पाच अधिकारी, कंत्राटदारांसह एकूण १२ आरोपींविरुद्ध ४ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील कालव्याच्या बांधकाम निविदेतील गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात पाच अधिकारी, कंत्राटदारांसह एकूण १२ आरोपींविरुद्ध ४ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.आरोपींमध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता व पूर्वअर्हता मूल्यांकन समितीचे सदस्य सोपान रामराव सूर्यवंशी, गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते, वरिष्ठ विभागीय लेखापाल चंदन तुळशीराम जिभकाटे, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के, अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता व मुखत्यारपत्रधारक रमेशकुमार सोनी यांचा समावेश आहे.आरोपींवर फसवणूक करणे, फसवणुकीच्या उद्देशाने संगणमत करणे, बनावट कागदपत्रे खरे भासवून वापरणे, कट रचणे, सरकारी अधिकाºयाने फौजदारी गुन्हा करणे हे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. सी. राऊत यांच्यासमक्ष गुरुवारी पुढील सुनावणी होईल. सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.आरोपींना तूर्तास अटक नाहीकालिंदी व तेजस्विनी शाह, विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जीगर ठक्कर व अरुणकुमार गुप्ता यांना नागपूर खंडपीठाने अंतरिम संरक्षण दिले आहे. एफआयआर रद्द करण्यासाठीचा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरोपींविरुद्ध पुढील आदेशापर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे. त्यामुळे आरोपींना तूर्तास अटक होणार नाही.कंत्राटदारावर ठपकाआर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांनी सदर निविदा प्रक्रियेसाठी पूर्वानुभवाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यांनी स्वत:ला प्रमुख कंत्राटदार भासवून कामाचे कंत्राट मिळविले. प्रतिस्पर्धी कंत्राटदारांची बयाणा रक्कमही भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन यांनी स्वत:च्या फर्मचे खात्यातून देऊन कृत्रिम स्पर्धा निर्माण केली असा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.- मोखाबर्डी योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकामासाठी सुरुवातीला ५१ कोटी ९ लाख ५७ हजार ९८४ रुपयांचे कंत्राट निश्चित झाले. त्यानंतर त्यात अवैधपणे वाढ करून आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीला एकूण ५६ कोटी ५७ लाख ३२ हजार ६८० रुपयांचे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे शासनाला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसला. चौकशीनंतर ३० मार्च २०१६ रोजी सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर