रूपेश खैरी, वर्धारुपेश मुळे नरबळी प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आसिफ शहा वल्द अजीम शहा ऊर्फ मुन्ना पठाण याच्या संपर्कात असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असावी, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले आहेत. आसिफ याने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी सुरुवातीला उत्तम महादेव पोहाणे (४३), अंकुश सुरेश गिरी (१८), सुरेश रामराव धनोरे (४५), दिलीप बाळकृष्ण भोगे (३७) व दिलीप उत्तम खाणकर (३४) या पाच जणांना ताब्यात घेतले.मात्र आसिफच्या बदलणाऱ्या जबाबामुळे त्यांची मुक्तता केली होती. तथापि, संशय वाढल्याने रविवारी रात्री या पाच जणांना पुन्हा ताब्यात घेतले आहे. आसिफला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नरबळीप्रकरणी आणखी पाच जण ताब्यात
By admin | Updated: November 17, 2014 03:32 IST