नवी मुंबई : स्वप्निल सोनावणे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तिघांना २७ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. इमाद ठाकूर, इब्राहिम मुकादम व विक्रम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. प्रेमप्रकरणातून नेरूळच्या स्वप्निलची (१५) मंगळवारी हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यात मुलीच्या आईवडिलांसह दोन भाऊ व साथीदारांचा समावेश आहे. तक्रार वेळीच न घेतल्यामुळे दोघा पोलिसांना निलंबित केले आहे. तपास गुन्हे शाखा उपायुक्त नितीन कौसडीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नेरूळ हत्येप्रकरणी आणखी पाच जणांना अटक
By admin | Updated: July 23, 2016 04:30 IST