शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील वाघोबासाठी आले ५ लाख पर्यटक

By admin | Updated: January 5, 2017 21:50 IST

व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यातून १४ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. मात्र २०१६ मध्ये पर्यटकांची संख्या तुलनेने बरीच कमी दिसून आली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत पर्यटनासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे विचारणा केली होती. २०१२-१३ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत किती पर्यटक प्रकल्पात आले, यातून किती महसूल प्राप्त झाला, किती वाघांचा मृत्यू झाला, इत्यादी प्रश्नांची त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एकूण ५ लाख ३ हजार ८३१ पर्यटकांनी भेट दिली. ९७ हजार ६०४ वाहनांतून हे पर्यटक आले होते. पर्यटनातून व्याघ्र प्रकल्पाला एकूण १४ कोटी ८७ लाख ६ हजार ९३४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ५ वर्षांत पर्यटकांची संख्या ५ लाखांवर गेली असली तरी २०१६ मध्ये आकडेवारी घटल्याचे दिसून आले. जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत केवळ ६७ हजार ९५३ पर्यटकांनी भेट दिली व यातून २ कोटी ६० लाख ७७ हजार ९३२ रुपयांचा महसूल मिळाला. १३ वाघांचा मृत्यू२०१२ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत व्याघ्र प्रकल्पातील १३ वाघांचा मृत्यू झाला. यातील ९ मृत्यू नैसर्गिक होते. मात्र २ वाघांची शिकार झाली, तर २ वाघांचा अपघाती मृत्यू झाला. २०१२ व २०१५ मध्ये सर्वाधिक ४ वाघांचा मृत्यू झाला. प्राणी, पक्ष्यांची माहितीच नाहीदरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात किती जंगली प्राणी व पक्षी आहेत याची नावासोबत संख्या उपलब्ध नाही. केवळ संकेतस्थळावर प्राणी व पक्ष्यांची सर्वसाधारण माहिती उपलब्ध आहे. सोबतच संबंधित कालावधीत किती विदेशी पर्यटकांवर कारवाई झाली, याची माहितीदेखील कार्यालयाकडे उपलब्ध नाही.