शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

एका पोटनिवडणुकीसाठी पाच लाख विद्यार्थी वेठीस; टीईटी परीक्षा पुन्हा महिनाभर लांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:29 IST

राज्यातील केवळ एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात होणारी टीईटी परीक्षा अचानक महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे.

- अविनाश साबापुरे यवतमाळ : राज्यातील केवळ एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात होणारी टीईटी परीक्षा अचानक महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात राजकीय सुंदोपसुंदीमुळे तब्बल दोन वेळा या परीक्षेची तारीख बदलण्याची वेळ परीक्षा परिषदेवर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी नेमकी ३१ ऑक्टोबर हीच तारीख राज्य शासनाने निवडली. त्यामुळे परीक्षा परिषदेला दोन पावले मागे येत टीईटी परीक्षेची तारीख बदलून ती ३० ऑक्टोबर करावी लागली. मात्र, आता केवळ दहा दिवस शिल्लक असताना गुरुवारी परीक्षा परिषदेने पुन्हा एकदा टीईटीची तारीख बदलून २१ नोव्हेंबर केली. टीईटीचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० पर्यंत होणार आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रकात म्हटले आहे.  या परीक्षेसाठी जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. याचेच निमित्त पुढे करून संपूर्ण राज्यभरातील परीक्षा केंद्रांना आणि उमेदवारांना परीक्षेसाठी महिनाभरानंतरची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होऊन परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे वर्षभरातच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला टीईटीसह  अन्य परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांच्याही तारखा राजकीय दबावामुळे बदलाव्या लागल्या आहेत.  ३० ऑक्टोबरला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.- तुकाराम सुपे, परीक्षा परिषदेचे आयुक्त