मुंबई : कळवा स्थानकाजवळील खारेगावजवळ रोड ओव्हर ब्रीजसाठी सहा स्टीलचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी रविवारी ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ११.२0 ते सायंकाळी ४.२0 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक निमित्ताने डाऊन धीम्या मार्गावर कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली तर अप धीम्या मार्गावर मुंब्रा आणि कळवा स्थानकात लोकल थांबणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मुलुंड आणि कल्याण दरम्यान डाऊन धीम्या आणि अर्ध जलद लोकल मुलुंडपासून जलद मार्गावर वळतील. सीएसटी ते चुनाभट्टी व माहिम अप आणि डाऊन मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक
By admin | Updated: January 7, 2017 05:38 IST