शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बडनेरामध्ये पाच तास खोळंबली हमसफर एक्स्प्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:52 IST

पाचशेवर प्रवासी संतप्त : ट्रेन रोखली, रेल्वे प्रशासनाचा गोंधळ

बडनेरा : गंगानगर ते त्रिचरापल्ली हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस पावसाच्या धोक्यामुळे बडनेरामार्गे वळविण्यात आली. या आकस्मिक बदलांची कल्पना नसलेल्या पाचशे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. काही प्रवाशांनी ही गाडी रोखून धरण्याचादेखील प्रयत्न केला. संतप्त प्रवाशांना पाच तासानंतर दुसऱ्या गाडीने भुसावळमार्गे पुण्याला पाठविण्यात आले. त्यानंतरच रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. हा प्रकार बुधवार, ७ ऑगस्ट रोजी घडला.राजस्थानमधील गंगानगर येथून निघालेली हमसफर एक्सप्रेस कल्याणमार्गे केरळमधील त्रिचरापल्ली येथे जाते. ही गाडी बडनेरामार्गे जात नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे या गाडीला भुसावळहून बडनेरापर्यंत आणण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही सूचना न देता आपल्याला एवढ्या दूर का आणले, याचा संताप व्यक्त करीत हमसफर एक्स्प्रेसमधील ५०० प्रवाशांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ घातला. हमसफर एक्स्प्रेस मूळ मार्गाकडे वळवा, असा त्यांचा आग्रह होता. सकाळी साडेनऊ  वाजता ही गाडी बडनेरा येथे पोहोचली. प्रवाशांच्या गोंधळावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात पाच तास ही एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबून होती. यादरम्यान प्रवाशांनी इतर गाड्या जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलिसांना पाचारण करण्यात आला. अखेर दुपारी २ च्या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवाशांना भुसावळ व पुण्याकडे रवाना करण्यात आले. स्टेशन प्रबंधक पी.के. सिन्हा, वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी, रेल्वे बलाचे सहायक निरीक्षक एस.जी. वानखडे, पी.के. भाकर आदी अधिकाऱ्यांनी तणाव निवळण्यासाठी परिश्रम घेतले. प्रवाशांना रवाना केल्यावर हमसफर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. 

सूचना मिळाली नाहीगंगानगर येथून निघालेल्या हमसफर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना गाडी वळविण्यात येणार असल्याची सूचना दिलीच नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या होत्या. जीपीएस, गाडीतील डिस्प्ले बंद होते. सुरतनंतर गाडीत टी.सी.देखील नसल्याचे प्रवाशांनी बोलून दाखविले.

पावसामुळे हमसफर एक्स्प्रेस बडनेºयाकडे वळविण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रवाशांना वेगवेगळ्या गाड्यांमधून त्यांच्या स्थानकाकडे पाठविण्यात आले.- शरद सयाम, वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

टॅग्स :Amravatiअमरावती