शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 15:27 IST

पुणे, दि. 28-   गणेशोत्सवाची सगळीकडेच नेहमी उत्सुकता असते. मुंबई असो किंवा पुणे प्रत्येक ठिकाणी मानाच्या समजल्या जाणाऱ्या बाप्पाच्या ...

ठळक मुद्देपुण्यात यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पुणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हरातील दर्शनी भागांमधील भितींवर गणरायाची विविधं रुपं साकारण्यात येत आहेत. सारसबागेजवळील बाबुराव सणस क्रीडा संकुलाच्या संरक्षकभिंतीवर पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आकर्षक चित्रं रंगविण्यात आली आहे

पुणे, दि. 28-  गणेशोत्सवाची सगळीकडेच नेहमी उत्सुकता असते. मुंबई असो किंवा पुणे प्रत्येक ठिकाणी मानाच्या समजल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करत असतात. लांबच लांब रांगा लावून गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळतं. अनेकदा तासनतास लांब रांगा लावूनही अनेकांना बाप्पाचं दर्शन घेता येत नाही. पण पुण्यामध्ये सध्या एक आगळीवेगळी संकल्पना राबवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे.

पुण्यात यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पुणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील दर्शनी भागांमधील भितींवर गणरायाची विविधं रुपं साकारण्यात येत आहेत. सारसबागेजवळील बाबुराव सणस क्रीडा संकुलाच्या संरक्षकभिंतीवर पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आकर्षक चित्रं रंगविण्यात आली आहे. भिंतीवर साकारलेली गणपतीही रूपं पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करत आहेत.

याठिकाणी मानाचा पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या गणपतींची सुंदर चित्रं रेखाटण्यात आलेली आहेत. सुबक चित्रं, आकर्षक रंगकाम नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. महापालिकेने एका खासगी कंपनीला हे काम दिले असून प्लॅस्टीक पेंटच्या माध्यमातून या भिंती रंगविण्यात येत आहेत. शहरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचू लागला आहे. भाविकांच्या उत्साहामध्ये यामुळे भर पडत असून पालिकेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव