शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

पाच दिवसांचा आठवडा

By admin | Updated: September 29, 2015 03:21 IST

राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी

यदु जोशी,मुंबई राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी ५ दिवस करण्यास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हिरवा झेंडा दाखविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर येण्याची शक्यता आहे. राज्यातील शासकीय कर्मचारी-अधिकारी संघटनांनी ३१ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवृत्तीचे वय ६० वर्षे आणि ५ दिवसांचा आठवडा करा, अशा दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यानुसार या मागण्यांवर अभ्यास करून प्रस्ताव देण्यास मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव क्षत्रिय यांना सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढवून द्यावी, असा प्रस्ताव क्षत्रिय यांनी तयार केला आहे. तो लवकरच मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी जाईल आणि नंतर तो मंत्रिमंडळासमोर येईल. सध्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते ५.३० किंवा काही जिल्ह्णांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. म्हणजे ७ तास ४५ मिनिटे कामकाज चालते. याऐवजी, आठवड्यातून पाच दिवस रोज ४५ मिनिटे जादा काम करण्याची तयारी संघटनांनी आधीच दर्शविली आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढविली जाईल, हे स्पष्ट आहे. या संबंधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली मुख्य सचिव कार्यालयात सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी सुटी असते. मात्र, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुटी असते. आठवड्यात दोन दिवस सुटी असेल तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन ते अधिक चांगले काम करू शकतात, असा तर्क पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी दिला जातो. शिवाय, पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारची एक दिवसाची वीज आणि इतर खर्च वाचतो, असाही दावा केला जातो. पाच दिवसाच्या आठवड्यावर मंत्रिमंडळाची मोहर उमटताच शासकीय कर्मचाऱ्यांचा ‘विक एन्ड’ जोरात साजरा होणार.---------राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८वरून ६० वर्षे करण्याची संघटनांची मागणी होती; मात्र ती अमान्य करण्यात आली असून, केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० असून, ते कायम राहील, असेही सूत्रांनी सांगितले. --------पहिल्या टप्प्यात मुंबई!मुंबईतील कर्मचारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी ३-४ तासांचा प्रवास करतो. त्यामुळे पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी सुरुवातीला मुंबईत करावी असाही एक प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, मंत्रालयासह राज्य सरकारची अनेक मुख्यालये येथे असल्याने अन्यत्र शनिवारी कार्यालये सुरू व मुख्यालय बंद, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. -----------कर्मचारी संघटनांनी सरकारला दिलेला प्रस्तावकर्मचाऱ्यांची महिन्यातील वर्षातील ३० मिनिटांचा भोजनमहिन्यातील वर्षातकार्यालयीन वेळसरासरी दिवस सरासरी दिवसकालावधी वगळून कामाचे तास ताससध्या२४ (२ शनिवार व २८८ ७ तास १५ मिनिटे १७४२०७७ ९.४५ ते ५.३०४ रविवार वगळून)(२४ * १२)(४३५ मिनिटे)तासतास५ दिवसांचा आठवडा २२ (४ शनि. व २६४८ तास१७६ २११२ ९.४५ ते ६.१५४ रवि. वगळून) (२२*१२)(४८० मिनिटे)तासतास