शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात, नवी मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 01:36 IST

सांगली शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.

सांगली : सांगली शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली. या प्रकरणी नवी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही दोन हजाराच्या ९२ नोटा जप्त केल्या आहेत. अटकेतील संशयितांची संख्या आता पाच झाली आहे.सूरज उर्फ मनीष मल्ला ठाकुरी (वय ३६, रा. अर्जुनवाडी, घनसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (४७, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, नवी मुंबई) अशी नव्याने अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (२८) प्रेमविष्णू रोगा राफा (२६), नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, कल्याण) या तिघांना अटक केली होती. हे तिघे व नव्याने अटक केलेला मनीष ठाकुरी २३ आॅगस्ट रोजी सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले. यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना ‘नोट बनावट आहे की काय’ असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला़बनावट कागदपत्रेअटकेतील संशयितांचे पाचही मोबाइल जप्त केले आहेत. याशिवाय प्रेमविष्णू राफा याची स्वत:च्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅन कार्ड, विविध बँकांची पाच एटीएम कार्ड जप्त केली आहेत. या सर्वांचे कोणकोणत्या बँकेत खाते आहे, याची माहिती काढण्याचे काम सुरूआहे.नाशिकमध्ये गुन्हाबनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन वर्षांपूर्वी अटकही झाली होती.

टॅग्स :Arrestअटक