शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या

By admin | Updated: January 28, 2016 02:08 IST

कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत

मुंबई: कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बुधवारी बोरीवली व मालाड परिसरात पाच बोगस डॉक्टर्सना बेड्या ठोकण्यात आल्या. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांविरुद्ध ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी आवाज उठविला आहे. अखेर मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.शिवधनी बसू सरोज, ऋषिकेश भगवान विश्वकर्मा, राम अखपाल यादव, रघुनाथ पुलीन अधिकारी व मुलचंद मनुलाल शिवर्ते अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टर्सची नावे आहेत. ही मोहीम सुरू राहणार असे उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.शहर व उपनगरात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याने, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वैद्यकीय व्यवसायाबाबत आवश्यक शैक्षणिक अर्हता नसल्याने, त्यांच्याकडून दिली जाणारी औषधे रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. त्यानंतर शासनाने पोलीस व महापालिकेने समन्वय साधून कारवाईसाठी सर्वसमावेशक समिती स्थापण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई पोलिसांनी नऊ पथकांची स्थापना केली आहे. सहायक आयुक्त अशोक जाधव, निरीक्षक राजेंद्र मोहिते व सहायक निरीक्षक संजय खेडकर यांनी नियोजन करून बुधवारी बोरीवली (प) येथील लिंक रोड येथील शिवधनी बसू सरोज, ऋषिकेश भगवान विश्वकर्मा, राम अखपाल यादव व मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातील रघुनाथ अधिकारी व मुलचंद शिवर्ते यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. दोन्ही कारवाईबाबत अनुक्रमे बोरीवलीतील एमएचबी पोलीस ठाणे व दिंडोशीतील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)अन्य विभागातील अधिकारीही सामीलबोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी स्थापन केलेल्या प्रत्येक पथकामध्ये पोलीस व महसूल विभागाचा एक अधिकारी, तसेच एक डॉक्टर व एका हवालदाराचा समावेश आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह कलम ३३,३६ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट-१९६१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.