शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पूर्णगड खाडीत मच्छीमारांची बोट उलटली; चार जण बुडाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:00 IST

पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे

ठळक मुद्दे पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण बुडाल्याची माहिती मिळते आहे.

रत्नागिरी, दि. 12- पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण बुडाल्याची माहिती मिळते आहे. या चारमध्ये तीन सख्खे भाऊ असल्याचंही समजतं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर दोन जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.  मंगळवारी पहाटे रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये ही घटना घडली आहे. हसन पठाण आणि जैनुद्दिन पठाण अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत

सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दिन लतिफ पठाण, अब्बास लतिफ पठाण, हसन लतिफ पठाण आणि तौकर अब्दुल सत्तार हे चारजण सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेले. सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे समुद्र खवळला होता. वाऱ्याचा वेगही वाढला होता. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची नौका उलटली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मासेमारी करणाऱ्या अन्य काही बोटींच्या माध्यमातून पठाण यांची बोट बुडाल्याची माहिती बाहेर आली आणि शोधकामाला सुरूवात झाली. बुडालेल्या चौघांपैकी हसन लतिफ पठाण याचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित तिघेजण अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांसह पोलीस बुडालेल्यांचा शोध घेत आहेत.

वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळाने दाणादाण; लाखोंचे नुकसानमुसळधार पावसाचा प्रत्यय कोकण किनारपट्टीमध्ये सगळीकडे आला आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, वैभववाडी आदी परीसरातही पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पाउस झाला. यावेळी चक्रीवादळाने नापणे, नाधवडे तिथवली परिसरात अक्षरश: दाणादाण उडवली. चक्रीवादळामुळे घरे, गोठे व मंदिराचे सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. तर तळेरे-वैभववाडी मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरु होती.

रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस सुरु असतानाच जोरदार चक्रीवादळ झाले. चक्रीवादळाच्या तडाख्याने झाड पडल्यामुळे नापणे येथील भवानी मंदिराचा कळस तुटून स्लॅबही कोसळला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.