शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अहमदनगरमध्ये मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 18:23 IST

अहमदनगर : राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणा-या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा पाच वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुळा धरणात मासेमारी करणा-या व्यावसायिकांनी ...

अहमदनगर : राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणा-या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा पाच वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुळा धरणात मासेमारी करणा-या व्यावसायिकांनी चिंगळी माशांची माळा गळ्यात घालून जानकर यांचा निषेध केला.या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, प्रा. सुभाष कडलग, बाबा शेख, भगवान बर्डे, हिरामन शिंदे, भारत पवार, संतोष शिंदे, ज्ञानदेव बडे, दौलत बडे, विष्णू माळी, छबुराव पवार, शिवराम माळी, सलिम शेख, देवराम पारधी, अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, आमीर शेख, शक्तीलाल गंगे, अल्ताफ शेख, सुनिल माळी, दिपक साळुंके, रंगलाल भोई, राजेश परदेशी, गणेश मोरे, सुरज पवार, चाँद शेख, गौतम गायकवाड, विजय मगर यांच्यासह मुळाथडी व मुळामाई मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे सभासद सहभागी झाले होते.जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणात मुळाथडी मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे ८७१ स्थानिक सदस्य मासेमारीद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाने परस्पर मुंबईच्या मे. ब्रिज फिशरिज कंपनीला २०१७-२०२१ या पाच वर्षासाठी मत्स्यमारीचा ठेका दिल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक मासेमारीचा व्यवसाय करणा-यांवर उपासमारीची कु-हाड कोसळली आहे. मासेमारी करणारे स्थानिक आदिवासी व्यावसायिक अशिक्षित असल्याने त्यांना डावलून आॅनलाईन पद्धतीने मुंबईच्या कंपनीस मत्स्यमारीचा ठेका देण्यात आला. सुमारे एक कोटी किंमतीचा मत्स्यमारीचा ठेका मुंबईच्या कंपनीला काही लाखात देण्यात आला आहे. हा ठेका रद्द करुन, स्थानिक आदिवासी जमातीतील मासेमारी करणा-यांना देण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्रीAhmadnagarअहमदनगर