शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पहिले यकृतदान, कुटुंबीयांच्या निर्णयाने तिघांना नवे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:53 IST

मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करत शनिवारी वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने आणखी एक नवा अध्याय लिहिला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या अवयवदानानंतर तब्बल २२ महिन्यांनी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करत शनिवारी वैद्यकीय क्षेत्रात औरंगाबादने आणखी एक नवा अध्याय लिहिला. ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला अन् मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले. अवयवदानाने तिघांना नवीन आयुष्य मिळाले.येथील दिनेश आसावा (५५) यांना गुरुवारी सायंकाळी ब्रेन हॅमरेज झाले. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. ब्रेन हॅमरेजचे निदान होताच मोठ्या रुग्णालयात दाखल केले. ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. तेव्हा कुटुंबीयांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. कमलनयन बजाज रुग्णालयात ब्रेनडेड समितीने त्यांची संपूर्ण तपासणी केली. त्याची विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना माहिती देण्यात आली.एमजीएम रुग्णालयात यकृत, एक किडनी माणिक हॉस्पिटल, तर एक किडनी बजाज रुग्णालयातील रुग्णास देण्याचे नियोजन करण्यात आले. मराठवाड्यात पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपण होणार असल्याने मुंबईहून ग्लोबल हॉस्पिटलचे पथक औरंगाबादेत आले.शनिवारी पहाटेपासून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली. रुग्णालयापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तब्बल ८ तास चालली....अन् हृदयाची धडधड थांबलीमुंबई-पुण्यासह देशातील सर्व प्रत्यारोपण करणा-या रुग्णालयांना अवयवदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. हृदय चेन्नईला पाठवण्यासाठी हालचाली झाल्या; परंतु हृदयदान करता आले नाही.- हृदयदानासाठी विमान सेवेपोटी येणारा खर्च उचलण्याची तयारीही आसावा कुटुंबियांनी दर्शविली. शहरात एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध नसल्यानेही अडचण झाली. एअर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली असती तर कुठेतरी हृदय प्रत्यारोपण शक्य झाले असते, असे डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद