शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ९ गोवारी विद्यार्थी होताहेत डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:33 IST

न्यायालयाने दिला दिलासा; तब्बल २४ वर्षांचा संघर्ष फळाला

- मंगेश व्यवहारे नागपूर : गोवारी हे गोंड राजाची जनावरे चारणारी जमात म्हणून ओळखली जायची. शासनाने २४ एप्रिल १९८५ रोजी सरकारने काढलेल्या एका निर्णयामुळे ही जमात आदिवासींच्या सवलतीपासून वंचित झाली. या अशिक्षित जमातीने तेव्हापासून सुरू केलेल्या संघर्षाला १४ आॅगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने विराम दिल्याने गोवारी समाजाचे ९ विद्यार्थी यंदा प्रथमच ‘नीट’ क्रॅक करून एमबीबीएसला प्रवेश करू शकले.स्वातंत्र्यानंतर गोवारी जमात अनुसूचित जमातीत मोडत होती. त्यांना आदिवासींच्या सवलतीही होत्या. परंतु १९८५ मध्ये एका सरकारी निर्णयात गोवारी हे ‘गोंडगोवारी’ असल्याचे नमूद केल्याने ते सवलतीपासून वंचित ठेवले. त्यानंतर या समाजाचा संघर्ष सुरू झाला आणि २३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या घटनेनंतर गोवारींना एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण मिळाले. पण त्यातही ३९ उच्च जातींचा समावेश केल्याने गोवारींचा फायदा झाला नाही. त्यामीळे २००८ मध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तब्बल १० वर्षांनी गोवारी हे आदिवासी आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळू लागले.वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ प्रवेशपरीक्षा गोवारी विद्यार्थ्यांनी ओबीसी प्रवर्गातून दिली. परंतु हे विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असल्याची गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी ‘नीट’च्या संचालकांना सांगितले. न्यायालयाचे दाखले पाहून ‘नीट’ च्या संचालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवर्ग बदलविला. त्यामुळे गोवारींच्या ९ विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती सवलतीच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. एकाचवेळी गोवारीचे ९ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकले.हे आहेत विद्यार्थीश्यामली लोहट, अमोल नेवारे, मोहिनी वाघाडे, किशोर राऊत, पार्थ नेवारे, सायली लक्ष्मण नेवारे, देवयानी माधव कोहळे, सौरभ मार्कंड राऊत, स्नेहल लोहटकर.११४ गोवारींचे बलिदानानंतरही २४ वर्षे आम्हाला न्यायासाठी झगडावे लागले. न्यायालयाने आमचे अस्तित्व मान्य केल्यामुळे आम्हाला उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले. पण अजूनही सरकारने आमचे अस्तित्व मान्यच केले नाही. गोवारी हेच आदिवासी आहेत, असा आदेश सरकारने काढावा, अशी आमची मागणी आहे. - कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज

टॅग्स :doctorडॉक्टर