शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग

By admin | Updated: July 14, 2016 19:50 IST

वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे सायकल टू वर्कला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे सायकल टू वर्कला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंग उपलब्ध करुन देण्याची अभिनव योजना पालिकेने आणली आहे़ पहिल्या प्रयोगात कुलाबा, चर्चगेट, फोट या विभागातील ४७ वाहनतळावर एकूण ४७० सायकलच्या पार्किंगची सोय असणार आहे़हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं आहेत़ येथील ४७ वाहनतळाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पे अ‍ॅण्ड पार्कच्या देखभालीकरिता पालिकेने निविदा मागविल्या आहेत़ २१ जुलै दु़ ३ वाजेपर्यंत आॅनलाईन पद्धतीने इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे़या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़ यामध्ये पहिल्यांदाच सायकल पार्किंगची सोय करण्यात आली आहे़ निविदेमध्ये तसा समावेश करुन ही पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़ या वाहनतळाच्या माध्यमातून पालिकेला दरमहा एक कोटी १४ लाख ३१ हजार रुपये महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.या ठिकाणी सायकलची मोफत पार्किंगहुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट, बलार्ड इस्टेट़़.वाहनतळाची क्षमतासरकारी व खाजगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळामध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़४७० सायकलला मोफत पार्किंगया वाहनतळावर प्रत्येकी दहा याप्रमाणे ४७० सायकलला मोफत पार्किंग उपलब्ध होणार आहे़यावर करावा अर्ज़..http://portal.mcgm.gov.in...www.mcgm.gov.in यावर इच्छुकांना निविदा भरता येणार आहे़ या प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या ठेकेदाराला सुरक्षा ठेवेसह सहा महिन्यांची बँक गॅरेंटी देणे मात्र बंधनकारक असणार आहे़