शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

माजगावची तेजश्री राज्यात प्रथम

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

मुलांमध्ये शशांक अव्वल : ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

माजगावची तेजश्री राज्यात प्रथममुलांमध्ये शशांक अव्वल : ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा झेंडाकोल्हापूर/मांगले : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील १३ जणांनी जिद्दीला कष्टाची जोड देत यशाचा झेंडा रोवला आहे. यात मांगले (ता. शिराळा) गावचा सुपुत्र शशांक अशोक कदम याने (३४० पैकी २४६ गुण), तर महिला गटात माजगाव (ता. राधानगरी) येथील तेजश्री विनायक चौगले हिने (३४० पैकी २०५ गुण) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पंढरपूरचा गणेश पाटील (२४१ गुण) व अजित बडे (२३७ गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. न्यू शाहूपुरीतील (कोल्हापूर) प्रभा किरण वाशीकर हिने क्रीडागटात प्रथम आणि शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रमोद अशोक आवळे याने अनुसूचित जाती गटांतून राज्यात पहिला क्रमांक मिळविला. बुधवारी सायंकाळी परीक्षेचा अंतिम निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर झाला. आयोगातर्फे ‘पीएसआय’च्या २६० पदांसाठी १८ मे २०१४ रोजी पूर्व आणि २१ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि १६ मार्च ते १३ एप्रिल २०१५ रोजी मुलाखती घेण्यात आल्या. अन्य यशस्वी उमेदवार असे : (कंसात राहणार, रँक) : महेश भागचंद कवाळे (सम्राटनगर, कोल्हापूर, ९), स्वप्नाली अनिल राजगिरे (जयसिंगपूर, २८), उज्ज्वला लक्ष्मण भिंगुडे (उजळाईवाडी, ता. करवीर, २९), अजित शंकर देसाई (पाटगाव, भुदरगड, ५४), संदीप संभाजी पाटील (कारंडेवाडी, ता. करवीर, ६८), गायत्री गणपतराव पाटील (पाचगाव), अरुण आनंदा बंडगर (लिले, जि. सांगली, २०), आकाश माणिकराव पाटील (इटकरे, जि. सांगली, २५), अभिजित राजेंद्र इंगळे (शिंदी बुद्रुक, जि. सातारा २७). दरम्यान, आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफे, इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली होती. यशस्वी उमेदवारांवर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी प्रत्यक्ष भेटून, मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. परीक्षेत शहरातील ए. बी. फौंडेशनच्या अकरा, एन. पी. स्पर्धा परीक्षा केंद्राचे दोन व स्टडी सर्कलच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. चिकाटीमुळेच यश : कदमपहिल्यापासून ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास व कष्ट केल्याने हे यश संपादन केले आहे. पहिल्या ‘टॉप फाईव्ह’मध्ये येईन, असा आत्मविश्वास होता. मात्र, पहिलाच आल्याने मला व माझ्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. सध्या पोलीस उपअधीक्षक परीक्षेचीही तयारी करीत असून, त्यामध्येही यश मिळवीन.मागासवर्गीयांमधून अहमदनगर जिल्ह्यातील पालवे वस्ती येथील अजित बडे हे पहिल्या स्थानी. एससी संवर्गात अव्वल : स्नेहल चव्हाण, अमोल जाधव, निशा श्रेयकर, पल्लवी जाधव, अपेक्षा मेश्राम, नीलम कांबळेमहिला गट खुला संवर्गातील पहिले तीन उमेदवार : तेजश्री पवार, रागिनी कराळ, नशिपून शेख महिला गट एन. टी. संवर्गातील अव्वल उमेदवारांची नावे : ज्योती मरकड, विद्या पवार, मयुरी तेलंग.राज्यात पहिला आलेला शशांक कदम हा वारणानगर येथील विनय कोरे स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. शशांकचे वडील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात भूगोल विषयाचे प्राध्यापक होते. ते नुकतेच सेवानिवृत झाले आहेत. शशांकचे प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण वारणानगरला झाले. त्याने कऱ्हाड येथील दौलतराव अहिर अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्र अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले. त्याला आई-वडिलांसह विनय कोरे स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रा. एस. आर. कुलकर्णी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.