शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिली नगरपालिका ‘पनवेल’च

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईराज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु ही माहिती राज्यात सर्वत्र पोहचविण्यास पालिकेला अपयश आल्याने सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधून पनवेलऐवजी रहिमतपूरला हा बहुमान दिला जात आहे. इंग्रज सरकारने शहरांमध्ये नागरी सोयी- सुविधा पुरविण्यासाठी १८५० मध्ये नगरपालिका कायदा अस्तित्वात आणला. यानंतर पनवेलमधील दक्ष नागरिकांनी हा कायदा लागू करण्याची मागणी केले. तेव्हाच्या सरकारने कमिशन नियुक्त करून २५ आॅगस्ट १८५२ मध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याचे निश्चित करण्यात आले. १ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. याविषयीची स्पष्ट नोंद १५ जानेवारी १८५७ च्या सरकारी गॅझेटच्या पान क्रमांक १३६ वर करण्यात आली आहे. सरकारी जाहीरनाम्याद्वारे ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीला तेव्हा मॅजिस्ट्रेट एक्स आॅफिशिओ प्रेसिडेंट असे संबोधले जात होते. १९१० मध्ये नगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली व युसुफ नुर मोहम्मद मास्तर हे पहिले नगराध्यक्ष झाले. आज पनवेल नगरपालिकेने १६४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. परंतु हा इतिहास पनवेलच्या घराघरापर्यंत पोहचविण्यास नगरपालिकेला अपयश आले आहे. नगरपालिकांची सुरवात पनवेलपासून झाली असली तरी पहिली नगरपालिका म्हणून राज्यभर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा उल्लेख केला जातो. सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमध्ये, संकेतस्थळ व इतर सर्व ठिकाणी रहिमतपूर हीच पहिली नगरपालिका असे ठसविले जात आहे. पनवेल हीच राज्यातील पहिली नगरपालिका आहे. २५ आॅगस्ट १८५२ मध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याचे शासन नियुक्त समितीने ठरविले. १ सप्टेंबर १८५२ मध्ये प्रत्यक्षात नगरपालिकेचे कामकाज सुरू झाले. याविषयी स्पष्ट उल्लेख १५ जानेवारी १८५७ च्या सरकारी गॅझेटमध्ये करण्यात आला आहे. रहिमतपूर नगरपालिकेच्या संकेतस्थळावरही तसा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु वास्तवात रहिमतपूरला १ मे १८५३ मध्ये नगरपालिका स्थापन झाली आहे. पनवेल नगरपालिका मात्र २५ सप्टेंबर १८५२ मध्ये स्थापन झाली आहे. याविषयी स्पष्ट उल्लेख शासकीय दस्तऐवजामध्ये करण्यात आला आहे. पनवेलचा बहुमान दुसरे शहर मिरवत असून त्याची कल्पनाच पनवेल नगरपालिका प्रशासनास नाही. राज्यातील सर्वात जुन्या नगरपालिकांमधील एक असाच उल्लेख केला जात आहे. यामुळे पनवेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही हे शहर म्हणून राज्यातील नगरपालिकांची सुरवात असल्याचे माहीतच नाही. पनवेलवासीयांनाच माहिती नसलेली गोष्ट राज्यात इतर शहरांमधील नागरिक व अभ्यासकांना कशी माहिती होणार? शासकीय यंत्रणांनी कधीच याविषयी योग्य माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रहिमतपूर हीच पहिली नगरपालिका असे विविध पुस्तकांतून वाचावे लागत आहे. पनवेलच पहिली नगरपालिका आहे हे राज्यभर बिंबविण्यासाठी आता नगरपालिकेसह, लोकप्रतिनिधी व या शहराचा अभिमान असणाऱ्या नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. >>>>>२५ आॅगस्ट १८५२ ची पहिली शासकीय कमिटी हरी पुरुषोत्तम बापटरामचंद्र बाळकृष्ण कर्वेभगवंतराव केशव शृंगारपुरेकुडाप्पा (खंडाप्पा) मोरप्पा गुळवे मुळजी पितांबर शेटमुल्ला इस्माईलहाजी मुल्ला गुलाम हुसेनमामलेदार पनवेलकस्टम सरकारकून