शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आधी मराठा, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण, मंत्र्यांमध्ये मात्र विसंवादी सूर कशासाठी?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 4, 2020 05:02 IST

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे महाविकास आघाडीचे धोरण असल्याचे समजते.

अतुल कुलकर्णी मुंबई : मुस्लिम आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी त्याकडे लक्ष देऊ नका. सर्वकाही नियोजनानुसार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना सांगितले आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे महाविकास आघाडीचे धोरण असल्याचे समजते.अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुस्लिम आरक्षणाबद्दल अद्याप शिवसेनेची भूमिका ठरलेली नाही. आमच्यापुढे कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे स्पष्ट केले. त्यावरून मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकमतला सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे बरोबरच आहे. मुस्लिम आरक्षणाबाबत मंत्रिमंडळात अथवा समन्वय समितीत चर्चा झालेली नाही. याबाबत सर्वांशी चर्चा करून भविष्यात निर्णय घेण्यात येईल.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचवेळी जर मुस्लिम आरक्षणाचा विषय आला आणि तोही मुद्दा जर सर्वाेच्च न्यायालयात गेला तर मराठा आरक्षण देखील रद्द होईल आणि मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण मिळाले नाही असा संदेश जाईल. तसे काहीही होऊ नये म्हणून आधी मराठा आरक्षणावर सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय येऊ द्यावा, त्यानंतरच मुस्लिम आरक्षणावर महाविकास आघाडी निर्णय घेईल असे ठरल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्री नवाब मलिक आणि एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे, त्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ठरले होते. त्यानुसारच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.>नवाब मलिकांचे घूमजाव!याबाबत मंत्री मलिक म्हणाले, माझ्या खात्याचा प्रश्न म्हणून मी सभागृहात उत्तर दिले. मात्र मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव अजून आमच्या विभागानेच तयार केलेला नाही. तो जेव्हा तयार होईल तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलून त्यावर निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकreservationआरक्षण