शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आधी भीती... नंतर थेट लग्नच लावले! एड्सग्रस्तांना समाजाने स्वीकारण्याची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:51 IST

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात....

- दत्ता बारगजे, संस्थापक, इन्फन्ट इंडिया 

न १९९८ मध्ये शिक्षण संपवून मी ग्रामीण रुग्णालय, भामरागड (जि. गडचिरोली) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आरोग्यसेवेत दाखल झालो. तेथून अवघ्या दोन-अडीच कि.मी. अंतरावरील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी, हेमलकसा प्रकल्पात ये-जा सुरू झाली. अधून-मधून बाबा आमटे येत असत. सोमनाथ प्रकल्पाच्या शिबिरात एकदा बाबा म्हणाले,‘आनंदवनाची बेटं’ निर्माण करा. हे त्यांचे वाक्य मनात खोलवर रुजले होते.

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. एड्स हे नाव उच्चारायलाही माणसं घाबरत असत. मी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तंत्रज्ञ! रक्ताच्या तपासण्या करत असताना एचआयव्ही / एड्सच्या तपासणीची जबाबदारीही माझ्यावर होती. एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली की वेदना, आक्रोश, भीती, अव्हेरलेपण, अपराधीपणाची भावना... असा सारा कल्लोळ दिसे. मी शक्य होईल तसा आधार देऊ लागलो. एड्स जनजागृतीसाठी शासकीय कार्यक्रम करताना दुसरीकडे एचआयव्हीबाधितांची अव्हेरलेली आयुष्ये, विस्कटलेली घरटी, मृत्यूच्या दिशेने होणारा अपरिहार्य प्रवास या सगळ्यांचे चटके बसत होते; कारण मी त्यांचा होऊन जगत होतो.

विशाल आणि योगेश या दोन मुलांना घेऊन ब्लड बँकेत आलेली पार्वती निमित्त झाली. ती व विशाल एचआयव्ही पॉझिटिव्ह; तर योगेश निगेटिव्ह! पार्वती ओक्साबोक्सी रडली... मी त्या तिघांना घरी घेऊन गेलो. संध्याने त्यांना जेवू घातले. आम्ही विशालला घरी ठेवून घेतले, पार्वती गेली ती पुन्हा कधीच परतली नाही. आईचा अंत्यविधी करून नऊ वर्षांच्या विशालने आमच्या घराचा रस्ता धरला तो कायमचाच. योगेशलाही तो सोबत घेऊन आला! पार्वतीच्या एकाकी मरणयातनांनी हादरलो होतो. मी संध्यासोबत चर्चा केली. ती होती. आमच्या घरीच इन्फंट इंडियाच्या कामाची सुरुवात झाली. विशालच्या वेदनेतून सुरू झालेल्या या कार्याला कोणत्याही विशिष्ट प्रारंभाची गरज लागली नाही. कालौघात आमच्या संस्थेत एड्सग्रस्त बालकांची रीघ लागली.

विशालमागोमाग सूरज आला... नंतर संजय, ज्योती, कोमल, नितीन... घर अपुरे पडू लागले. जागेची शोधाशोध सुरू झाली. मी दिवसभर नोकरीत; संध्या मुलांचा सांभाळ करायची! मग भाड्याने जागा घेतल्या. भाडे भरायची पंचाईत झाली, तेव्हा अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. मुले लहान असताना खाणे-पिणे, शाळा, आरोग्याची देखभाल(ART-CD4) आजारपण.... संस्कार महत्त्वाचे होते. मुलांची संख्या ४५ झाल्यावर संस्थेने स्वत:ची जागा घेतली.

सन २०१४ मध्ये राणी आणि कोमल या दोन मुलींचे पहिले कन्यादान आम्ही केले. समाजातील एचआयव्ही पॉझिटिव्ह वर शोधून, त्याची गृहचौकशी करून, मुलीलाही घर-दार-प्रॉपर्टी पाहण्याचा अधिकार देऊन असे विवाह जुळवण्याचा नवीन पायंडा पाडला. त्यानंतर असे २१ विवाह ‘आनंदग्राम’मध्ये पार पडले. घरापासून बालपणीच वंचित झालेल्या मुलींना हक्काचे घर व आपलेपणाची नाती मिळाली. त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुले एचआयव्ही निगेटिव्ह असणे, हा मोठा दिलासा झाला!  

हळूहळू वाढत्या वयातील मुलांचे वेगळे प्रश्न डोके वर काढू लागले. स्वतःचे वेगळेपण, समाजाबद्दलचा राग, तिरस्कार, आपले आयुष्य-भविष्य अंधारलेले आहे, अशी भावना. मग समुपदेशन, पुनर्वसन हे प्रश्न पुढे आले. काहींना शासकीय आयटीआयच्या माध्यमातून कौशल्यविकास... काहींना खासगी नोकरी, योग्य जोडीदार शोधून उपवर मुला-मुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम सुरू झाले. 

काही वर्षांपूर्वी अस्पृश्य ठरवून समाजात हिणकस जिणे वाट्याला आलेल्या एड्सग्रस्तांना हळूहळू समाजाने स्वीकारण्याची ही कहाणी आहे. बदलाचा वेग कमी असेल; पण आपला समाज बदलतो आहे, याचा हा पुरावाच! 

टॅग्स :HIV-AIDSएड्स