शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

Mucormycosis: डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी?; रुग्णालयाचा बोलण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:42 IST

Mucormycosis: म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याची मुलानं दिली माहिती; सध्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू

कल्याण: कल्याण डोंबिवलीत म्युकरमायकोसीस पहिला बळी गेला आहे. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात सहा रुग्णावर उपचार सुरू असताना बाजीराव काटकर (वय ६९ वर्षे) यांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा वैभव काटकर यांनी दिली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.दावडी परिसरात सेवा निवृत्त बाजीराव काटकर हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. २५ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आधी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी २ लिटर ऑक्सिजनची गरज होती. त्याना म्युकरमायकोसीस आजार झाल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला होता. बाजीराव काटकर यांचा मुलगा वैभव याचे म्हणणे आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने वडिलांना एम्स रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी १५ लिटर ऑक्सिजनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजाराने त्यांचा एक डोळा बाधित झाला होता. याच आजाराने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. वडिलांना चांगले उपचार मिळाले नाहीत असे वैभव यांनी सांगितले. या खाजगी रुग्णालयात सहा रुग्ण म्युकरमायकोसीसचे आहेत.  याबाबत रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.धोका वाढला! म्युकरमायकोसिस मुंबईच्या वेशीवर पोहोचला; ठाण्यात पहिल्या रुग्णाची नोंद

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात  म्युकरमायकोसिसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण रुग्णालय प्रशासनाकडून नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू म्युकरमायकोसीसमुळेच झाला असल्यास दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या