नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता देवीस नैवेद्य, धूप-आरती व अंगारा लावल्यानंतर विशेषालंकार पूजा करून आरती करण्यात आली. दरम्यान, बुधवारी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली. याचवेळी मूर्तीची विधिवत सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेवेळी विशेष पंचामृत अभिषेक करण्यात आला.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेवर नित्योपचार पंचामृत अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 06:55 IST