अहमदनगर : खासगी जागेच्या वादातून गुरुवारी दुपारी पाथर्डी - नगर रस्त्यावर एका महिलेवर बंदूक रोखण्यात आले. या वेळी झालेल्या झटापटीमध्ये बंदुकीतून गोळीबार झाला. या प्रकरणी नगरसेवकाचा पुतण्या प्रशांत शेळकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सपना काटे या पतीच्या मालकीच्या नवीन पंचायत समिती समोरील कार्यालयासमोर खुर्चीवर बसलेल्या असताना प्रशांत मोटारसायकलवरू आला. त्याने कमरेला लावलेली बंदूक रोखली. बंदूक बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बंदुकीतून गोळीबार झाला.
पाथर्डीत जागेच्या वादावरून गोळीबार
By admin | Updated: August 28, 2015 01:01 IST