शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार

By admin | Updated: June 24, 2017 00:51 IST

कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला; मात्र त्यातून ते बचावले.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 24 : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला; मात्र त्यातून ते बचावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता झळकी (कर्नाटक) येथे घडली. वाळू तस्करीतून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. पिंटू पाटील आणि हणमंत पाटील या वाळू व्यवसायातील दोघा भावांवर झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार माजी आमदार रविकांत पाटील यांनी पोलिसांकडे वारंवार केली होती. पोलिसांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शुक्रवारी दुपारी रविकांत पाटील यांनी वाळू वाहतूक करणारी चार वाहने अडवली. या वाहनात परवान्यापेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात होती. पाटील यांनी ही वाहने बळजबरीने वजन काट्याकडे वळवली. त्यातील दोन वाहन चालकांनी शिताफीने वाहने पळवून नेली. उर्वरित दोन वाहनांचे वजन करण्यासाठी रविकांत पाटील व त्यांचे वाहनचालक वजन काट्याजवळ उभे असताना त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आणि हल्लेखोर पसार झाले. यात कोणीही जखमी झाले नाही. ती दोन्ही वाहने रविकांत पाटील यांनी झळकी पोलीस ठाण्यात नेली आणि वाळू तस्करी करणारे पिंटू बाबुराव पाटील आणि हणमंत बाबुराव पाटील (रा.शेगाव ता.अक्कलकोट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि पाटील यांच्यात गुन्हा दाखल करण्यावरुन वादविवाद सुरु होता. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान झळकी पोलिसांनी पिंटू पाटील व हणमंत पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, अशी माहिती रविकांत पाटील यांचे चिरंजीव विराज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या काही महिन्यांपासून पिंटू पाटील आणि माजी आमदार रविकांत पाटील यांच्यात वाळू उपसा आणि वाहतुकीबद्दल वाद सुरु होता. रविकांत पाटील यांनी चार तरुणांना आपल्याकडे पाठवून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार पिंटू पाटील यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात केल्याचे समजते. हा राग रविकांत पाटील यांना होता. वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी त्यांनी शुक्रवारी वाहनांवर पाळत ठेवून ही वाहने पकडली. वाहनात परवाना आणि क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात होती. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली होती. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. 

रविकांत पाटील यांनी मला वारंवार धमक्या दिल्या.वाळू उपसा करणार असशील तर तीन कोटी रुपये दिले पाहिजेत असा दम भरला. आठ दिवसांपूर्वी चार गुंडांना माझ्याकडे पाठविले. त्या गुंडांना मी धरुन ठेवले असता. रवी पाटील यांनी हातापाया पडून त्यांना सोडवून नेले. तोच राग मनात धरुन त्यांनी आज मी गोळीबार केल्याचा आळ घेतला आहे. ही घटना पूर्ण खोटी आहे. गोळीबार झालाच नाही.पिंटू बाबुराव पाटील, शेगावगेल्या काही महिन्यांपासून पिंटू पाटील हा अवैध मार्गाने वाळू उपसा करुन कर्नाटकात वाहतूक करीत होता. त्याच्या गाड्या नेहमी ओहरलोडेड असायच्या, त्यातून अनेक अपघात झाले आहेत. साहेबांनी (रविकांत पाटील) त्याला ताकीद दिली. परंतु तो मुजोरीने वागत होता. त्यामुळे आज त्याची वाहने पकडून वजन करीत असताना, दोघांनी गोळीबार केला. विराज पाटीलरविकांत पाटील यांचे चिरंजीव