शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

शॉर्टसर्कीटमुळे आग; ९ घरे भस्मसात

By admin | Updated: March 11, 2016 03:08 IST

अकोला जिल्ह्यातील घटना; लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज.

मूर्तिजापूर /कुरुम (अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी (बपोरी) गावाशेजारच्या वस्तीत गुरुवार, १0 मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नऊ घरे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सोनोरी (बपोरी) या गावाला लागूनच वस्ती आहे. या वस्तीत दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केले. आगीत एका पाठोपाठ एक अशी नऊ घरे जळून खाक झाली. या घरांमधील अन्नधान्य, भांडी-कुंडी, कपडे यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. अचानक ओढवलेल्या या संकटाने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आले आहेत. या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. आगीची वार्ता पसरताच गावकर्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. गावकर्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून, आग आटोक्यात आणली. तोपर्यंत नऊ घरांची राखरांगोळी झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अग्निशामक दलाचे वरातीमागून घोडेगावात भीषण आग लागल्यानंतर सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांनी याबाबत मूर्तिजापूर येथील अग्निशामक दलास माहिती दिली; परंतु अग्निशामक दलाचे वाहन पोहोचण्यास बराच विलंब झाला. तोपर्यंत ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून, आग पूर्णत: विझवली होती.