शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडून पेटवले घर, मजुराचा मृत्यू!

By admin | Updated: March 13, 2016 01:59 IST

अकोला येथील घटना; कर्जामुळे होता घरगुती कलह

अकोला - खोलेश्‍वर परिसरात घराला लागलेल्या भीषण आगीत घरमालक जागेवरच जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. घनशाम पाटनकर हे मृताचे नाव असून, त्यांनी घरामध्ये फटाके फोडून आग लावल्याची माहिती समोर आली आहे.खोलेश्‍वर परिसरातील रहिवासी, हातमजुरी करणारे घनशाम सुखदेवराव पाटनकर (४३) यांच्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर आहे. या कर्जामुळे कौटुंबिक वादविवाद सुरु झाले. पती-पत्नीच्या वादात मुलांचीही फरपट होत असल्याने त्यांची पत्नी मुलांसोबत कधी खदान परिसरातील माहेरी राहायची, तर कधी पतीकडे. या परिस्थितीमुळे पाटनकर यांना दारुचे व्यसन लागले. या सर्व व्यापातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. शुक्रवारी त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली, तर भाऊ कुटुंबीयांसह नागपूर येथे गेले होते. घनशाम पाटनकर रात्री घरी एकटेच असताना, त्यांनी फटाके फोडून घराला आग लावली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात संपूर्ण घर जळून पाटनकर हेदेखील आगीच्या विळख्यात सापडले. या आगीमध्ये होरपळून पाटनकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांनी आरडा-ओरड केली; मात्र शेजारी मंडळी आणि अग्नीशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविण्यापूर्वीच पाटनकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. अग्नीशमन विभागानेही आगीवर नियंत्रण मिळविले. पाटनकर यांचा संपूर्ण जळालेला मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. आगीच्या दुर्घटनेमुळे कुटुंबाला काही शासकीय मदत मिळणे शक्य होईल, या विचारातून त्यांनी घराला आग लावल्याची चर्चा परिसरात होती.