शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेच्या अरविंद भोसलेंविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 10:10 IST

नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.

मुंबई- नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली तसंच जिथे पोस्टर्स लावले होते त्या भावात असलेल्या दुकानदारांनकडून अधिका माहिती घेऊन पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतं आहे. वरळी नाक्यावर नारायण राणे यांच्यावर टीका करणार पोस्टर लावल्यामुळे येत्या काळात शिवसेना - काँग्रेस यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. 

नेमकं प्रकरण काय? नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत टीका करण्यात आली आहे. अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर चर्चेचा विषय होते. या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘इच्छा माझी पुरी करा’ या शीर्षकाखाली नारायण राणे यांच्या विरोधातील पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली आहे. या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतरही नारायण राणेंची झाकली मूठ..!काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. माझ्यासोबत २५ आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी शहा यांना दिल्याचं समजतं आहे. त्याआधी दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणे, दानवे व पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यावरून राणेंचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र शहा यांच्यासोबतच्या बैठकीत राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाली नाही. राणेंनी शहा यांना सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस