शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

बेपत्ता तरुणास शोधले ‘फेसबुक’वर!

By admin | Updated: February 4, 2015 03:06 IST

गेल्या सात वर्षांपासून या तरुणाचा नातेवाईक, मित्र अशा सर्वच माध्यमातून शोध सुरू असताना पोलिसांनाही त्यांच्या तपासात ‘फेसबुक’चा आधार लाभला.

पोलिसांनी घेतला ‘सोशल मीडिया’चा आधार : सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला शिरपूर (जि. धुळे) : सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरले आहे. मुख्य म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून या तरुणाचा नातेवाईक, मित्र अशा सर्वच माध्यमातून शोध सुरू असताना पोलिसांनाही त्यांच्या तपासात ‘फेसबुक’चा आधार लाभला.बोराडीच्या फार्मसी महाविद्यालयातून बेपत्ता झालेला हेमंत चरणदास लांजेवार नागपूरमधील एका हॉटेलात कूक (स्वयंपाक करण्याचे) म्हणून काम करीत होता. तपास अधिकारी विजय आटोळे यांनी हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग करून त्याचा शोध लावला. तळोदा नगरपालिकेच्या रुग्णालयातील कक्षसेवक चरणदास किसनलाल लांजेवार (मूळ रा. भंडारा) यांचा हेमंत एकुलता एक मुलगा. १९ सप्टेंबर २००७ रोजी हेमंत कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाला. सात वर्षांत त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. तपास अधिकारी आटोळे यांनी या प्रकरणाच्या १०० पानांच्या अहवालाचा अभ्यास केला. हेमंतचा मित्र सचिन काहीतरी लपवित असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी उलट चौकशी केल्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वीच हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग केल्याचे सांगितले़ त्यानंतर आटोळे यांनीही फेसबुकवरून हेमंतशी चॅटिंग सुरू केली. त्याचा मोबाइल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. हेमंतने तो नागपुरात असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर त्याने फोन घेणे बंद केले. त्यामुळे आटोळे यांनी थेट नागपूर गाठले आणि हेमंत तेथे एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करीत असल्याचे त्यांना आढळले. हेमंतला घेऊन ते शिरपूरला आले. हेमंतला भेटल्यानंतर आपला बेपत्ता मुलगा परत आलाय, यावर लांजेवार पती-पत्नीचा विश्वासच बसत नव्हता. (प्रतिनिधी)माझ्या वडिलांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांच्यावर माझ्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजा पडू नये, म्हणून मी घरातून निघून गेलो होतो. आई-वडिलांसमोर परत कसे यावे, हे मला समजत नव्हते. माझे चाळीसगावचे मित्र सचिन माळी व सुरज चौधरी यांच्याशी मी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होतो. - हेमंत लांजेवार