शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  आर्थिक व्यवहारांना फटका, राज्यातील ५० हजार बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:53 IST

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली.

 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी  या संपात राज्यातील ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपामुळे शहरी, ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना फटका बसला.  (Financial transactions hit due to strike of bank employees, participation of 50,000 bank officers and employees in the state)युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली. १० हजारांहून जास्त शाखांतून काम करणारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकातील सफाई कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बँकांचे   दरवाजे उघडले गेले नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची एक बैठक या आठवड्यात अपेक्षित आहे, ज्यात बँक खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन तीव्र करण्याविषयी निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

जमावबंदी असल्याने निदर्शने, धरणे नाहीसंपकरी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील चर्चगेट, सीएसएमटी, अंधेरी स्टेशनवर तीन ते चारच्या गटांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, बँक खासगीकरणाला विरोध व्यक्त करणारे मास्क लावून आपली भूमिका समजावून सांगणारी पत्रके प्रवाशांना वाटली. राज्यात सर्वत्र जमावबंदी असल्यामुळे नेहमीप्रमाणे धरणे, निदर्शने करण्यात आली नाहीत. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकStrikeसंप