शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:51 IST

यशकथा :  सर्कलवाडीच्या मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धीचा आदर्श निर्माण केला आहे. 

- संतोष धुमाळ (सातारा) 

स्ट्रॉबेरी म्हटले की प्रथमत: महाबळेश्वर व पाचगणीचे नाव घेतले जायचे. तर पूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे; पण अ   लीकडे या पिकाचे उत्पादन इतर ठिकाणीही होऊ लागले असून, त्यातून भरघोस उत्पादन मिळत आहे. अशाच प्रकारे कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडीच्या मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धीचा आदर्श निर्माण केला आहे. 

सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडी येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र्र सरकाळे यांनी राबविलेल्या प्रयोगातून येथे स्ट्रॉबेरी उत्पादनाची चळवळ सुरू झाली. त्यांचे  अनुकरण करीत सर्कलवाडीचे युवा शेतकरी मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरी रोपे व फळाच्या उत्पादनातून भरघोस आर्थिक समृद्धी साधली आहे. मंगेश सरकाळे हे गेल्या ८ ते ९ वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून त्यांनी आपल्या कुटुंबाची व्यवस्थित आर्थिक घडी बसविली आहे. यावर्षी त्यांनी केलेल्या लागवडीतून किमान पंधरा लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. चांगले उत्पादन मिळण्याची खात्री झाल्याने सरकाळे दरवर्षी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी पिकाचे नियोजन करतात. 

स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी प्रथमत: जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करतात. यासाठी एकरी साधारणत: ८ ते १० टन शेणखत वापरले जाते. त्यानंतर जमिनीवर गादीवाफे तयार करतात. १ एकर मदरप्लॉटच्या लागवडीसाठी साधारणत: ३ ते ४ हजार रोपांची आवश्यकता असते. एका रोपासाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून मंगेश सरकाळे यांनी स्ट्रॉबेरीच्या फळ उत्पादनापेक्षा रोपे उत्पादनावर भर दिला. त्यातून लाखोंची उलाढाल करून अपेक्षित यश मिळविले आहे.एक एकर प्लॉटमधून शाखीय विस्तार वाढ पद्धतीतून साधारणत: अडीच ते तीन लाख रोपे तयार केली जातात. पाण्याच्या बचतीसह तणाच्या बंदोबस्तासाठी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.  लागवडीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीत फळधारणेस सुरुवात होते. फळाच्या परिपक्वतेच्या कालावधीत प्रत्येक दिवशी पहाटे फळांची तोडणी करून प्रतवारीनुसार बॉक्समध्ये पॅकिंग करून माल गोवा व इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो.

बदलत्या हवामानामुळे दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी पिकावर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून सरकाळे हे रासायनिक तसेच जैविक व सेंद्रिय खताचादेखील वापर करीत आहेत.  भांडवली खर्च विचारात घेता एक एकर मदर प्लॉटमधून साधारणत: ७ ते १० लाख रुपये व फळ उत्पादन प्लॉटमधून ४ ते ५ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. असे असले तरी दरानुसार त्यात फरक होत आहे. विविध  कारणांमुळे स्ट्रॉबेरीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. तरीही योग्य नियोजन केल्यास उत्पादनात यश मिळतेच अशी माहिती शेतकरी मंगेश सरकाळे यांनी दिली. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी