शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 17:52 IST

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सांगितले.

- राजा माने

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा झपाटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष कार्यापद्धतीमुळे देशातील आणि राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी उभी आहे. यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचे कौतुक करताना सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगचे कारण सांगितले.

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सांगितले.

- दक्षिण सोलापूरमध्ये दरवेळी होणारी चुरशीची लढत यावेळी पाहायला मिळत नाही. ही निवडणूक सोपी झाली असं आम्ही एकतोय ?देशमुख : 20 वर्षापासून मी राजकारणात आहे. राजकारणाचा गंध नसताना 1998 मध्ये मला भारतीय जनता पक्षाने राजकारणात आणलं. 2004 मध्ये मी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीविरुद्ध सोलापूरमधून पहिल्यांदा लोकसभेला लढलो. त्यानंतर 2009 मध्ये मी माढा मतदार संघातून लढलो. शरद पवारांविरुद्ध माझा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये तुळजापूरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगितले. तर 2014 मध्ये युती तुटल्यानंतर अखेरच्या क्षणी मला दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. शेतकरी, गरीब आणि शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदींनी आखलेल्या धोरणामुळे हे सरकार जनतेला आपलंस वाटतं आहे. जनतेचा विश्वास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आला. महाराष्ट्रात देखील केंद्राप्रमाणेच पुनरावृत्ती होईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यावर आलेली संकट कोणताही आवाज न होता चाणाक्षपणे हाताळली. कर्जमाफी, घरकूल, जलयुक्तशिवार या योजनांमुळे विरोधकांना विजयाची शाश्वती राहिली नाही, म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत, असंही देशमुख म्हणाले.

- विरोधक बोलत नसले तरी, शिवसेना नियमीत सरकारच्या कामावर आक्षेप नोंदवते. कर्जमाफीवरून सेनेने आक्षेप नोंदवला असून कर्जमुक्तीची भूमिका घेतली. यावर का वाटते ?देशमुख : शिवसेना असो, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असो या सर्व पक्षांची धोरणं ठरलेली असतात. त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपला पक्ष मोठा व्हावा. शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या बाबतीत म्हणाल, तर फडणवीस यांची भूमिका सुरुवातीपासूनच कर्जमुक्तीची आहे. मोदी आणि फडणवीस यांना देश आणि महाराष्ट्र वैभवशाली करायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपन्न करायचा आहे. या भूमिकेप्रमाणेच पक्ष नेतृत्वाकडून कृती करण्यात येत आहे.

- विरोधीपक्षातील नेत्यांच्या इनकमिंगसाठी तुम्ही गळ लावून बसले नव्हते ?देशमुख : आम्ही कुणालाही आमच्या पक्षात या म्हणून निमंत्रण दिले नाही. परंतु, जनतेने या नेत्यांच्या कानात सांगितले की, आता आम्ही तुमच्यासोबत राहू शकणार नाही. तुम्ही भाजपमध्ये गेलात तर आम्ही तुमच्यासोबत राहू. त्यामुळेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील लढाई लुटूपुटू ठरतेय का, येथील राजकारण तुमच्या मते कसं आहे ?देशमुख : मला असं वाटतं की, कोणतीही निवडणूक लुटूपुटू नसते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची भूमिका नेतृत्व ठरवत असते. या मतदार संघात अनेकदा बदल झालेले. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना याच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांतील मंत्रीपदाच्या कार्यकाळात हदवाढ भागातील कामं केलीत. कचरा व्यवस्थापन, रस्त्याचं जाळ आम्ही विनले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ रुग्णांच्या उपचारासाठी सात ते आठ कोटींचा निधी मला दिला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न मुख्यमंत्र्यांनी पाहिलेलं आहे. जनता देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला साथ देईल, असं मला वाटतं.