शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पालघरच्या ‘त्या’ एपीआयची बदली रद्द

By admin | Updated: April 26, 2017 02:04 IST

खंडणीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या तपास अधिकारी व पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा

मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या तपास अधिकारी व पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक प्रशांत लांगी यांची परस्पर करण्यात आलेली बदली अखेर रद्द केली आहे. कोकण परिमंडळ विभागाचे विशेष महानिरीक्षक प्रशांत बुगडे यांनी सोमवारी रात्री बदलीचे आदेश मागे घेतले. लांगी यांनी अटक आरोपीला वसई न्यायालयात हजर करत असताना आपल्यावर केलेली कारवाई न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. महत्वाच्या गुन्ह्याचा तपास प्रलंबित असताना बुरडे यांनी त्यांची तडकाफडकी बदली केल्याने पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुुरु होती. सोशल मीडियावरुन त्याचे मॅसेज ‘व्हायरल’ झाले होते. पालघर जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ता व पत्रकार असल्याच्या बुरख्याखाली माहिती गोळा करुन विविध अधिकारी, उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या डॉ. शरद यादववर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला पालघरमधील शिवसेनेच्या नगरसेवकाची साथ असल्याची चर्चा आहे. यादवला अटक झाल्यास आपण अडचणीत येण्याच्या भीतीने त्या नगरसेवकाकडून प्रयत्न सुरु होते. यादव हा उत्तर प्रदेशला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर लांगी हे १७ एप्रिलला तिकडे रवाना झाले होते. त्याचा शोध करीत असतानाच विशेष महानिरीक्षक बुरडे यांनी १९ एप्रिलला तपास अधिकारी लांगी यांची ‘एलसीबी’तून पुढील आदेशापर्यंत पोलीस नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश काढले होते. (प्रतिनिधी)