शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्वच्छतेचे फलक हटविले - आॅनलाईन लोकमतची मंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Updated: August 8, 2016 14:25 IST

स्वच्छतेत महाराष्ट्र नं. १ या फलकाच्या खालीच घाणीचे साम्राज्य असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर झळकताच त्याची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सदर फलक तेथून हटविण्याचे आदेश दिले.

अशरफ पटेल/ गजानन गोरे
ऑनलाइन लोकमत
देउळगावराजा (बुलडाणा), दि. ८ -  स्वच्छतेत महाराष्ट्र नं. १ या फलकाच्या खालीच घाणीचे साम्राज्य असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर झळकले. याची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुलडाणा जिल्हाधिका-यांना सदर फलक
तेथून हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ सदर फलक दुस-या ठिकाणी लावण्यात आले. यासोबतच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश आगार प्रमुखांना दिले आहेत.
 देउळगाव राजा येथे बसस्थानक परिसरात शासनाने स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नं. १ असे फलक लावण्यात आले होते. मात्र या फलकाच्या खालीच घाण साचली होती. याबाबतचे वृत्त आॅनलाईन लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आॅनलाईनला सदर वृत्त पाहल्यानंतर बुलडाण्याचे जिल्हाधिकारी विकास झाडे यांना सदर फलक त्वरीत हटविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिका-यांनी देउळगावचे उपविभागीय अधिकारी व नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांना सूचना केल्या. त्यानुसार ७ आॅगस्ट रोजी नागपंचमीच्या सुटीच्या दिवशीही कर्मचाºयांनी तत्काळ फलक हटवून दुस-या 
ठिकाणी लावले. यासोबतच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश बुलडाणा आगार प्रमुखांना दिले. बुलडाणा आगार प्रमुखांनी सोमवारी सकाळीच देउळगाव राजाला जावून बसस्थानक परिसराची
पाहणी केली.
(स्वच्छता अभियानाचा 'दिव्याखाली अंधार')
 
 
स्वच्छतेचे फलक हटविले घाण कायम
शासनाने लावलेले स्वच्छतेचे फलक शासनाने हटविले खरे मात्र घाण अजूनही तेथे कायमच आहे. घाणीच्या वरच स्वच्छता अभियानाचे फलक लावले होते. याबाबत वृत्त झळकताच शासनाने याची गंभीर दखल घेतली. मात्र स्वच्छता करण्याऐवजी
त्यांनी फलक हटविण्याला प्राधान्य दिले.⁠⁠⁠⁠ जिल्हाधिकारी डॉ विजय झाड़े यांनी पाहिणी करुण सफाई करण्यासाठी आदेश दिले तर बसस्थानक प्रशासनास सचलेल्या पाण्याचा प्रवहा  काढण्यासाठी मदत करावी असे आदेश दिले.
- मदन जाधव,  प्रभारी मुख्याधिकारी, देऊळगाव राजा.