शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अंतिम लढत बरोबरीत

By admin | Updated: April 29, 2016 02:14 IST

वाकड गावचे ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त झालेल्या निकाली कुस्ती आखाड्यात सुमारे तासभर चाललेली अंतिम लढत बरोबरीत सुटली.

वाकड : वाकड गावचे ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त झालेल्या निकाली कुस्ती आखाड्यात सुमारे तासभर चाललेली अंतिम लढत बरोबरीत सुटली. इंदोरचा हिंदकेसरी पैलवान रोहित पटेल व दिल्लीचा भारतकेसरी परवेश कुमार यांच्यात अटीतटीची व चुरशीची लढत झाली. दोन्ही मल्लांनी डाव-प्रतिडावांनी नवीन उभारण्यात आलेला आखाडा गाजविला. म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त प्रथमच निकाली कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले. राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष मयूर कलाटे यांच्या पुढाकाराने व वाकड ग्रामस्थांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी म्हातोबा मंदिर पायथ्याशी स्वतंत्र आखाडा उभारण्यात आला होता. त्यातील अनेक चुरशीच्या लढतींनी प्रचंड गर्दी केलेल्या कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली. उत्सव कमिटीने यंदा निवडक निकाली कुस्त्यांचे आयोजन केले होते. देशातील नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्याने स्पर्धेला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. हिंदकेसरी गणपत आंधळकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले, हभप रविकांतमहाराज वसेकर, वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जे. शेख यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. या वेळी रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी युद्धवीरसिंग, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी नगरसेवक विठ्ठल काटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल उपस्थित होते. या वेळी वाकड ग्रामस्थांच्या वतीने हिंद केसरी आंदळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम विजेत्यांना दोन लाख रुपयांचे इनाम देण्यात आले. निवेदक बाबा लिमण यांनी आखाड्याचे सूत्रसंचालन केले.एकूण चाळीस निकाली कुस्त्या लावण्यात आल्या. चुरशीच्या निकाली कुस्त्या पुढीलप्रमाणे : महेश मोहोळ विरुद्ध समाधान घोडके (विजयी), समीर कोळेकर विरुद्ध सचिन येलभर (विजयी), साईनाथ रानवडे विरुद्ध देवा घोडके (विजयी). समीर देसाई विरुद्ध विक्रम वडितले ही लढत बरोबरीत सुटली. (वार्ताहर)