शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मस्टार बिगड गए है

By admin | Updated: January 10, 2016 01:04 IST

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात

औरंगाबाद : केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात यावे, म्हणजे त्यांना त्यांची योग्यता कळेल, असे आव्हान त्यांनी दिले.देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोपही त्यांनी केला. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय संमेलनानिमित्त उमा भारती शनिवारी औरंगाबादेत आल्या होत्या. भाजपा परिवारातील एका नेत्याने यावर्षी अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम सुरू होईल, असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या, राममंदिराविषयी कुणी वक्तव्य केले असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. दिल्ली विद्यापीठात सुब्रह्मण्यम स्वामींना प्रवेश करण्यापासून अडविले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे तर काय आहे. आमीर खानची सुरक्षा काढली म्हणून आमच्याकडे खुलासा मागितला जातो. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा कमी-अधिक केली जाते. तरीही सरकारला दोषी ठरविले जाते. (प्रतिनिधी)नोकरशाहीची नकारात्मताबाहेरच्या चांगल्या गोष्टी बघून आमच्यात प्रचंड ऊर्जा संचारते. त्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्रही त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवितो. मंत्रालयात पोहोचल्यावर आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. थंड डोक्याचे नकारात्मक विचारांचे अधिकारी ती गोष्ट कशी होऊ शकत नाही, याच्या कारणांचा पाढाच वाचतात, असे भारती यांनी सांगितले. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) आयोजित पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय परिषदेत देशातील ९० पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.