शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विचार करून भरा अर्ज; अन्यथा बसेल भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांची अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीचा अर्ज भरताना काळजीपूर्वक आणि विचार करूनच भरावा लागेल, नाहीतर आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

यंदा पीसीबी आणि पीसीएम गटासाठी स्वतंत्र परीक्षा आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने पीसीएम गटातून अर्ज भरल्यास आणि त्यानंतर रद्द करून पीसीबी गटातून परीक्षेचा अर्ज भरल्यास, त्या विद्यार्थ्याला पूर्वी भरलेला अर्ज रद्द करावा लागेल. मात्र, त्या अर्जासाठी भरलेली रक्कम त्याला मिळणार नसल्याचे, सीईटी सेलने सोमवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. सीईटीचा अर्ज बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा शुल्काचा भुर्दंड बसेल.

याच परीक्षेच्या आधारावर अभियंत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. मागील वर्षापासून पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब निकालासाठी केला जात आहे, ज्यामध्ये निकालावेळी अनेक तक्रारी आल्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा अभियांत्रिकी व वैद्यकीय दोन्ही क्षेत्रांतही प्रवेशाची इच्छा असणाºया विद्यार्थ्यांना पीसीएमबी ही परीक्षा देण्याऐवजी त्यांनी या दोन्हीच्या म्हणजे पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) व पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) स्वतंत्र परीक्षा द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असणार आहे. स्वतंत्र परीक्षा होणार असल्याने त्यांचे शुल्क आणि अर्जही विद्यार्थ्यांना स्वतंत्र, वेगवेगळ्या पद्धतीने भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शुल्क सवलत दिली जाणार नाही.

च्आतापर्यंत शुल्क भरून नोंदणी केलेले विद्यार्थी - २,१८,११७च्पीसीएम परीक्षेसाठी आलेले अर्ज - ८४,३३४च्पीसीबी परीक्षेसाठी आलेले अर्ज- ८५,७५३च्पीसीएम आणि पीसीबी परीक्षेसाठी आलेले अर्ज -४८,०३०