शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

हवामान खात्याच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल

By admin | Updated: July 14, 2017 16:49 IST

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे

ऑनलाइन लोकमतबीड/माजलगाव, दि. 14 : पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज आज माजलगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी भाई गंगाभीषण थावरे यांनी  दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.कायदेशीर बाबी तपासून अर्जावर पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस होमार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या होत्या.त्यासाठी महागडे बियाणे खरेदी केले होते.प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही.त्यानंतरही येत्या 48 तासात पाऊस येणार 72 तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले,यामागे बियाणे कंपन्या,खत आणि औषधी कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे काही आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले असून ही तक्रार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली गेली आहे.यावर दोन दिवसात कारवाई झाली नाही आणि गुन्हा दाखल केला गेला नाही तर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.