शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:31 IST

 'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी सोनी वाहिनी, अभिनेता. अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली आहे.

पुणे : 'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी  सोनी वाहिनी, अभिनेता. अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली आहे. त्याकरिता त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे . दुसरीकडे सोशल मीडियावरही तरुणांनी वाहिनीचा निषेध केला आहे. त्याकरिता अनेकांनी सोशल मीडियावर मोहीमही उभारली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमात  'इनमे से कोनसे शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...? या प्रश्‍नावर चार पर्याय देण्यात आले  होते. त्यात  ए ) महाराणा प्रताप बी ) राणा सांगा सी ) महाराजा रणजीत सिंह डी ) शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. त्यात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. 

 याबाबत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, ह्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक खोडसाळपणे उत्तरांच्या पर्यायांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा' उल्लेख 'एकेरी' शब्दात फक्त 'शिवाजी' हा करण्यात आलेला आहे. हे निषेधार्ह आहे. महाराजांची बदनामी म्हणून बच्चन, वाहिनी आणि संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा'.    

याच विषयावर सर्वेश देशपांडे या तरुणानेही समाजमाध्यमांवर याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो लोकमतशी बोलताना म्हणाला की, या पर्यायांमध्ये इतर तीन सम्राटांच्या नावापुढे उपाधी लावण्यात आली आहे. त्यामुळे नजरचुकीने होणारी चूक म्हणता येणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अखंड हिंदुस्थानचे दैवत मानतो. त्यामुळे या चुकीची वाहिनीने बिनशर्त माफी मागावी. आणि नुसती लहान पट्टी चालवून नाही तर महाराजांचा आदरपूर्वक उल्लेख करून अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी. कारण आमच्या रक्तात महाराजांचा डीएनए आहे. असे झाले नाही तर होणाऱ्या उद्रेकास वाहिनी जबाबदार असेल. 

टॅग्स :Kaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड