यौद्धा लढतोय पेन्शनसाठी...

By Admin | Published: August 23, 2016 02:24 AM2016-08-23T02:24:16+5:302016-08-23T02:24:16+5:30

१९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धातील युद्धसैनिक आयुष्याच्या उत्तरार्धात पेन्शनसाठी भटकंती करतो आहे. ११ वर्षे

Fighting for war criminals ... | यौद्धा लढतोय पेन्शनसाठी...

यौद्धा लढतोय पेन्शनसाठी...

googlenewsNext

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने क्रिकेट व गोल्फसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु आॅलिम्पिकमध्ये सहभाग असणाऱ्या खेळांसाठी मैदान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकही मैदान व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. खेळाच्या नावाखाली क्लबचे स्तोम वाढविण्यावर भर दिला आहे. कुस्तीपासून इतर खेळांना दुय्यम स्थान दिल्यामुळे सुनियोजित शहरासाठीही आॅलिम्पिक पदक दिवास्वप्नच ठरत आहे.
नवी मुंबईची रचना करताना प्रत्येक सेक्टरमध्ये मैदान उपलब्ध करून देण्याचे धोरण निश्चित केले होते. महापालिका व खाजगी शाळांनाही स्वतंत्र मैदान उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नोडमध्ये स्पोर्ट क्लब व विविध क्रीडा संघटनांसाठी भूखंड आरक्षित केले आहेत. परंतु प्रत्यक्षात या मैदानांचा वापर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी होत नाही. शहरामध्ये कुस्तीची आवड असणारे हजारो नागरिक आहेत. कृष्णा रासकर, वैभव रासकर यांच्यापासून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले खेळाडू शहरात वास्तव्य करत आहेत. २० वर्षे महापालिका व सिडकोकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु सिडको व महापालिकेने आश्वासनांशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. ट्रक टर्मिनलजवळ मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड टाकून कुस्तीगीर सराव करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मध्ये बापू उणावणे यांनी सम्राट क्रीडा अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. परंतू सिडकोने त्यांना सक्तीने भूखंड मोकळा करण्यास भाग पाडले. मैदानच नसल्याने राज्यपातळीवर चमक दाखविलेले ५० पेक्षा जास्त मल्लांना अर्ध्यावरतीच खेळ सोडावा लागला आहे. जीममध्ये जावून पिळदार शरीर बनविणे व मैदानावर क्रिकेट खेळणे याव्यतिरिक्त कोणत्याही खेळांना प्राधान्य दिले जात नाही.
सिडकोने अनेक क्रीडा संघटनांना भूखंडांचे वितरण केले आहे. परंतू या संघटनांना चांगले खेळाडू घडविण्यात अपयश आले आहे. नवी मुंबईमधील खेळ हा शालेय स्पर्धांपुरताच मर्यादित राहिला आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास दहावीच्या परीक्षेत जादा दहा गुण मिळतात म्हणूनच खेळांमध्ये सहभाग घेतला जातो. आॅलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा सहभाग आहे त्यांचे प्रशिक्षण देणारे एकही केंद्र नवी मुंबईमध्ये नाही. शहरामध्ये वर्षभर ५ ते ६ मॅरेथॉन स्पर्धा होतात. परंतू त्या स्पर्धांमध्ये गांभीर्य नसते. इव्हेंटचे स्वरूप दिले जात असून त्यामधून खेळाडू घडण्यासाठीचे प्रयत्नच होत नाहीत. महापालिकेच्या सर्व मैदानांची दुरवस्था झाली आहे. शाळांनी त्यांच्या ताब्यातील मैदानांना टाळे लावले आहेत. अनेक ठिकाणी मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. झोपडपट्टीतील नागरिकांसाठी मैदानाचा भूखंड नाही. खेळाडूंसाठी मैदाने व प्रशिक्षणाची सुविधा नसताना आॅलिंपिक विजेते खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>क्रिकेटचे मैदान धूळखात
सिडकोने डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट अ‍ॅकॅडमीला १२ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी नेरूळमध्ये एक लाख चौरस मीटरचा भूखंड दिला. विजय पाटील यांनी तेथे भव्य स्टेडीयम उभारले. परंतु अद्याप त्या मैदानामध्ये एकही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच होवू शकली नाही. २०१९ मध्ये युवा फुटबॉल विश्वचषक होणार असला तरी या मैदानाचा खेळाडू घडविण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही.
>सिडको कुस्तीसाठी भूखंड देत नाही व महापालिकेच्या आखाड्याला मुहूर्त मिळेना झाला. यामुळे ट्रक टर्मिनलजवळ पत्र्याचे शेडमध्ये आखाडा सुरू आहे. ५० खेळाडू येथे प्रशिक्षण घेत आहेत. आर. के. शिरगावकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू कृष्णा रासकर, प्रशिक्षक दत्तात्रय दुबे यांनी आखाडा सुरू ठेवलाय.

Web Title: Fighting for war criminals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.