शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना मारण्यापेक्षा सीमेवर लढावे, फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:09 IST

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला.

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला. मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होतोय याचा राग त्या गरीब परप्रांतीय फेरीवाल्यांवर का काढता, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाले आपले पोट इमानदारीने भरतात, ते चोरीचपाटी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्यात आमचा रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा न करता भाजपालाच पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथे भाजपाला अथवा लोकशाही पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाल्यास रिपब्लिकन पक्षालाही सत्तेत सामावून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाढत्या महागाईमुळे गरिबांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पण केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. पैसे येताच ते गरिबांसाठी खर्च केले जातील, असे सांगत त्यांनी केंद्राची आर्थिक चणचण उघड केली. शिवसेनेने भाजपाशी सतत भांडू नये, एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसे न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार असल्याचे भाकीत आठवले यांनी केले. राज्यातील फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली असून त्यात दलित-पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यावर लवकरच दोन्ही सभागृहांची मान्यता घेतली जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.>उद्धव यांना क्लीन चिट : राज ठाकरे यांच्याकडे देण्याजोगे काहीच नसल्याने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाले, असा दावा आठवले यांनी केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणताही घोडेबाजार केला नसल्याची क्लीन चिट त्यांनी दिली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले