शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करण्यासाठी लढा : नम्बुदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 20:07 IST

नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी अशी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणा-या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचा-यांची संख्या एक लाख ३० हजार आहे़ कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता, यासह विविध सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आगामी काळात युनियन तीव्र लढा देणार असल्याचे ...

ठळक मुद्देदोन दिवसीय परिषद : कर्मचा-यांच्या मागण्यांवर विचारमंथनसातव्या वेतन आयोगाची मागणी

नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी अशी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणा-या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचा-यांची संख्या एक लाख ३० हजार आहे़ कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता, यासह विविध सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आगामी काळात युनियन तीव्र लढा देणार असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बीएसएनएल कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व्ही,ए.एन.नम्बुदरी यांनी रविवारी (दि़३) केले़कॅनडा कॉर्नरवरील दूरसंचार कार्यालयात बीएसएनएल एम्पलॉईज युनियन व बीएसएनएल क्रॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या युनियनच्या उद्घाटनाप्रसंगी नम्बुदरी बोलत होते़ पुढे बोलताना म्हणाले की, कामगार चळवळीला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले असून शासन मूठभर लोकांसाठी कामगारांची पिळवणूक करीत आहे़ बीएसएनएल कंपनीचे खासगीकरण होऊ नये, कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कंत्राटी कामगारांनी संघटना स्थापन करावी, बीएसएनएल युनियन या संघटनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन नम्बुदरी यांनी यावेळी दिले़आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे सचिव अनिमेश मित्रा यांनी शासन कामगारांवर कसा अन्याय करते याबाबत माहिती दिली़ किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता या सुविधा कंत्राटी कर्मचा-यांनाही मिळाव्यात यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला़ यावेळी व्यासपीठावर बीएसएनएलचे आॅल इंडीया असिस्टंट जनरल से्रकेटरी जॉन वर्गिस, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ़डी़एलक़राड, महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष आप्पासाहेब गाजरे, सीताराम ठोंबरे उपस्थित होते़ महाराष्ट्र सर्कलचे सचिव नागेश नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले़ राजेंद्र लहाने यांनी प्रास्ताविक केले़या परिषदेला आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्यासह युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दरम्यान, परिषदेत सोमवारी (दि़४) होणा-या बीएसएनएल एम्पलॉईज युनियनमध्ये कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची मागणी केली जाणार असून यासाठी महाराष्ट्रातील युनियनचे जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत़