शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 14:54 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खुलं आव्हान दिलं आहे

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खुलं आव्हान दिलं आहे हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुम्हाला तुमची ताकद समजेल, असं खुलं आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे.

सांगली, दि. 18- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना खुलं आव्हान दिलं आहे. हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुम्हाला तुमची ताकद समजेल, असं खुलं आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे. सदाभाऊ खोत यांनी सांगलीत बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा

सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा नारळ आष्ट्यात फुटणार

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांची 7 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली होती. सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत नेमलेल्या चार सदस्यीय समितीने, पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हकालपट्टीची घोषणा केली होती. राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा नव्हती तर फक्त क्लेश यात्रा होती, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टीसदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी तशी घोषणा आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांनी ही माहिती दिली. ''आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे'', असं दशरथ सावंत म्हणाले. तसेच ''सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती यावेळी सांगण्यात आली.  

सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा नारळ आष्ट्यात फुटणार?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे दहीहंडी अथवा विजयादशमीच्या मुहूर्तावर या संघटनेचा नारळ फुटणार असल्याचे वृत्त होतं. संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत द्विधावस्थेत आहेत. आजही त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतो. ते आता नव्या संघटनेच्या स्थापनेच्या तयारीला लागले आहेत. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत