मोरगाव (जि. पुणो) : बारामती तालुक्याच्या जिरायती भागास शेतीसिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी उपोषणद्वारे लढा देणारे व बारामती विधानसभा निवडणूक लढविणारे चंद्रकांत कदम यांना जिल्हा बॅँकेच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले. कदम हे अंध असून, बॅँकेच्या पुणो येथील मुख्य शाखेत लिफ्टमन म्हणून कामास होते. ते रोजंदारीवर कामास होते आणि वागणो- बोलणो चांगले नसल्याने त्यांना कमी करण्यात आल्याचे बॅँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.
कदम हे बारामती तालुक्यातील तरडोली गावातील रहिवासी आहेत. मुंबई येथे एका खासगी बँकेत ते कामास होते. 2क्13 च्या दिवाळीमध्ये त्यांनी बारामती तालुक्यातील 22 गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी उपोषण केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या शिफारसीवरूनच त्यांना पुणो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत 1 फेब्रवारी 2क्14 रोजी लिफ्टमन म्हणून कामाला घेतले. कदम यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.