शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

By admin | Updated: September 16, 2016 06:56 IST

रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ : रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली मानाच्या गणपतींची मिरवणुक संध्याकाळपर्यत चालली. गणेशभक्तीचे नानाविध रंग या मिरवणुकीत पाहायला मिळाले. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदांमध्ये झाले.१) पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती. चांदीच्या पालखीतून या बाप्पाची मिरवणूक निघाली. सनई चौघड्याला तुतारीची साथ, ढोलताशांच्या तालावर रंगलेला टिपरीचा खेळ, कलावंत तसंच कामायनीचं ढोलपथक या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य होतं. २) तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघाली होती. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठा होता. इतिहास संशोधक मंडळाने सादर केलेल्या जिवंत देखाव्याने शिवरायांचा इतिहास जागवला.३) मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणुक फुलांच्या राजेशाही रथातून निघाली. ध्वजपथकाचा पदन्यासही चित्तवेधक होता. नेहमीप्रमाणे गुलालाची उधळण करत या गणपतीला निरोप देण्यात आला. ४) तुळशीबाग गणपतीची मूर्ती भव्य आणि देखणी आहे. फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ऑलंपिक २०२० च्या तयारीचा अनोखा रथ या मिरवणुकीत पाहायला मिळाला. विविध विषयांवरील समाजिक प्रबोधनपर रथदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ५) केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत सनई चौघड्यांच्या जोडीला श्रीराम , शौर्य तसंच शिवमुद्रा ढोलताशा पथकं सहभागी झाली होती. त्याशिवाय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त सादर करण्यात आलेला देखावा लक्षवेधी होता.